रंकाळ्यात उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या

0
263

कोल्हापूर प्रतिनिधी : कागल तालुक्यातील सळकुड गावातील विवाहित महिलेने रंकाळा तालावात उडी घेवून आत्महत्या केली.पूजा सागर गवळी (वय २५)
असे तिचे नाव आहे. मयत पूजा ही माहेरी सुभाष नगर येथे राहण्यासाठी आली होती.मंगळवारी सायंकाळी
ही घटना घडली.जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, सुभाषनगर येथे राहणाऱ्या पूजा हिचा विवाह सात वर्षापूर्वी सुळकूड येथील सागर गवळी यांच्याशी झाला होता. सागर व पुजाला दोन मुले आहेत. चार दिवसांपूर्वी ती आईकडे राहण्यास आली. मंगळवारी सकाळी तिने आईला  मैत्रीणीकडे जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडली. सायंकाळी चार वाजता डी. मार्टच्या समोर रंकाळा तलावात पूजाने उडी मारली. ही घटना घडताना रंकाळा परिसरात फिरण्यासाठी आलेल्या लोकांनी आरडा ओरडा केला. त्यानंतर याबाबत  अग्नीशमन दलाला माहिती दिली.अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत.तलावात शोध मोहीम सुरू केली. दरम्यान काही वेळातच पूजाचा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. तिच्याजवळ पर्समधील कागदपत्रावरून तिची ओळख पडली. जुना राजवाडा पोलीसांनी नातेवाईकांना बोलवून घेवून आत्महत्येची माहिती दिली. पुजाने आत्महत्या का केली याचे कारण समजलेले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here