वंचित बहुजन आघाडीची मंठा शहरात महारॅली

0
327

जालना प्रतिनिधी कैलास चव्हाण : वंचित बहुजन आघाडीने शनिवार ता 14 रोजी मंठा शहरातून काढलेल्या भव्य रॅलीने विरोधकांना धडकी भरली. शहरात या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडीचे परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय चव्हाण यांनी महारॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये पार्लमेंटरी बोर्डचे अण्णाराव पाटील, प्रदेश महासचिव नवनाथ पडळकर, यशपाल भिंगे ,मोहन राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. मंठा फाटा येथून या महारॅलीला सुरुवात झाली, बँड बाजा सहित फटाक्यांची आतषबाजी करत वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ,बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा गगनभेदी घोषणा देत ही रॅली मुख्य रस्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुढे ही रॅली छत्रपती शिवाजी चौकात विसर्जीत करण्यात आली .तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला .या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक बोराडे, भारिपचे जिल्हाध्यक्ष दीपक डोके, वंचित बहुजन आघाडीचे परतुर तालुका अध्यक्ष रोहन वाघमारे ,मंठा तालुका अध्यक्ष डॉ. त्रिभुवन, दीपक मोरे ,भारत उघडे, गुलाबराव बचाटे, चोखाजी सौंदर्य ,जगदीश राठोड, अविनाश चव्हाण, सुनील इंगळे, सुरमासिंग जुनी ,पंकज राठोड, राहुल नाटकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here