राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा – अमरसिंह घोरपडे

0
340

सेनापती कापशी:प्रतिनिधी
स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे काम केले.कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले.पाण्याचे प्रश्न सोडवले.त्यांच्याच विचारांचा वारसा जपण्याचे काम राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.त्यांच्या प्रयत्नातून कागल मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मंजूर झाला आहे.त्यांच्या हातून असेच कार्य होत राहण्यासाठी राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.असे प्रतिपादन शाहू साखरचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी केले. हसूर खुर्द,ता.कागल येथील गाव अंतर्गत रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी राजे विक्रमसिंह घाटगे बँकेचे अध्यक्ष एम पी पाटील,शाहू कारखाना संचालक युवराज पाटील,भाजप तालुका अध्यक्ष संजय पाटील,शाहू कृषी संघाचे संचालक संजय चौगले, कर्नल शिवाजीराव बाबर,प्रा.सुनील मगदूम,संजय बरकाळेयांच्यासह दगडू पाटील,पी डी पाटील,ए एस पाटील,अमृत पाटील,सुभाष गडकरी,उपसरपंच दत्तात्रय पाटील,डी व्ही पाटील,हरी चावरे,रामभाऊ पाटील,शिवाजी माळवी,विजय पाटील आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक अशोक पाटील तर आभार के टी पाटील यांनी मानले.तसेच कापशी जि.प.मतदारसंघातील वडगाव,हसूर बुद्रुक,मांगनूर आदी गावातील अंतर्गत रस्ता कामांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here