राधानगरी विधानसभेवर काँग्रेसचा हक्क – सत्यजित जाधव,उमेदवारी न दिल्यास बंडखोरी अटळ!

0
616

आजरा. संभाजी जाधव:
राधानगरी मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ आहे पण मधल्या काळात तो मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला पण राधानगरी मध्ये काँग्रेस प्रबळ असून होऊ घातलेल्या विधासभा निवडणूकीत हा मतदार संघ काँग्रेसला सोडावा अन्यथा बंडाची भूमिका घेण्यात येईल असा इशारा राधानगरी-भुदरगड- आजरा च्या काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
मागील वेळी राष्ट्रवादीच्या के.पी.पाटील यांचा बहुसंख्य मताने पराभव झाला , त्यामुळे राष्ट्रवादीने आपला हक्क येथे सांगू नये ! अन्यथा जर हा मतदारसंघ काँग्रेसला दिला नाही तर ह्याचे परिणाम म्हणून पुन्हा काँग्रेसचा बंडखोर उमेदवार असेल आणि राधानगरीमधील काँग्रेस संपुष्टात येण्यासाठी वरिष्ठ नेते जबाबदार असतील त्यामुळे पुन्हा एकदा विचार करून जागा वाटप करण्यात याव्यात अशी थेट भूमिका राधानगरी – भुदरगड काँग्रेस नेत्यांच्याकडून घेण्यात आली आहे. याबाबत वरिष्ट क्राँग्रेस नेत्यानी विचार करावा असे कार्यक्रत्याचेही मत असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here