चेन स्नॅचर ‘गोपी गँग’ जिल्हयातुन हद्दपार.

0
137

कोल्हापूर प्रतिनिधी – शहरासह जिल्ह्यात मोटारसायकल वरून सोनसाखळी हिसकावुन दशहत माजवणाऱ्या तिघांच्या टोळीला पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले.
या टोळीवर संपूर्ण जिल्हयात धमकावून आणि सोनसाखळी चोरी केल्याच्या गुन्ह्याची नोंद आहे.
योगेश उर्फ गोपी राजेश गागडे,रियाज नबी तांबोळी (दोघेही रा. गणेश कॉलनी.शिंगणापूर) आणि साहेल उर्फ जॉनटी राजू मांगलेकर ( रा. संकपाळनगर,कसबा बावडा) अशी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.संघटित गुन्हे करणारी म्हणून गोपी गँगची ओळखले जाते. टोळीचा मोहरक्या योगेश उर्फ गोपी गागडे याच्यासह रियाज तांबोळी व साहेल मांगलेकर

हे तिघेही सराईत गुन्हेगार  आहेत.संशयितांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शस्त्राचा धाक दाखवून, महिला व लोकांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरल्याचे गुन्हे संशयितावर अनेक ठिकाणी दाखल आहेत. गणेश उत्सव, मोहरम तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘गोपी गँग’ला अटकाव करण्यासाठी या गँगला एक वर्षासाठी  हद्दपार करण्याचा प्रस्ताव करवीर पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाला मंजुरी देत पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी एक वर्षातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार संशयिताना कोल्हापूर जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here