पोलिसांनी होमगार्डना घेतले ताब्यात,दृष्य पाहून सारे अवाक् !

0
428

कोल्हापूर :
वेळ सायंकाळी साडे सहाची…स्‍थळ दसरा चौक…होमगार्ड संघटना आमच्‍या मागण्‍या मान्‍य करा नाही तर खुर्च्या खाली करा अशी घोषणाबाजी करत आक्रमक झाले होते. आंदोलन रोखण्‍यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला. आंदोलकांना शांत बसण्‍याचे आवाहन केले जात होते. पण घोषणाबाजी सुरूच राहिल्‍याने पोलिसांनी होमगार्डना ताब्‍यात घेतले.दसरा चौकातील हे दृष्‍य पाहून उपस्थितही आवाक झाले. पण काही क्षणातच त्‍यांना समजले की हा दंगल काबू पथकाचा सराव होता.सायंकाळी सहा वाजता लक्ष्‍मीपूरी पोलिस ठाण्‍याचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर, शाहुपूरीचे पोलिस निरीक्षक संजय मोरे, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर हे दसरा चौकात दाखल झाले. यावेळी दसरा चौकात आंदोलकांची भूमिका होमगार्डनी वठवली. विविध मागण्‍यांसाठी होमगार्डस घोषणाबाजी करत होते. पाच मिनिटे घोषणाबाजी केल्‍यानंतर पोलिसांकडून आंदोलकांना समज देण्‍यात आली. कायदा सुव्‍यवस्‍थेचे पालन करा, अशा सूचना पोलिसांकडून देण्‍यात येत होत्‍या. पण आंदोलक ऐकत नव्‍हते. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांवर चाल केली व त्‍यांना ताब्‍यात घेतले.हे पाहणार्‍यांना खरोखरच पोलिसांनी आंदोलकांना ताब्‍यात घेतल्‍याचे वाटत होते. आंदोलन काळात कशा पध्‍दतीने परिस्‍थिीत हाताळायची याचे प्रात्‍यक्षिक या सरावाच्‍या माध्‍यमातून देण्‍यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here