कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या !

0
129

जळगाव | कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. श्रीकांत ज्ञानेश्वर बहिरम असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. बहिरम अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील रहिवासी होत कर्जबाजारीपणाला कंटाळून श्रीकांत यांनी आपल्या शेतातच गळफास घेतला. गेल्या चार वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावर खासगी सावकाराचे, सोसायटीचं कर्ज वाढलं असल्याचं कळतंय.श्रीकांत यांनी यापूर्वीही शेतातील फवारणीचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अखेर त्यांनी शेतातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
दरम्यान, श्रीकांत बहिरम यांना एक 8 वर्षाचा मुलगा आणि एक 12 वर्षाची मुलगी, पत्नी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here