गणेशोत्सवासाठी सावर्डेकडे येत असलेल्या चाकरमान्यांच्या बसला आग ,६० जण बचावले

0
259

चिपळूण प्रतिनिधी :- गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या
चाकरमान्यांच्या एसटी बसला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव – वडपाले गावाजवळ भीषण आग लागली . या आगीत बस पूर्ण जळाली .सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. आगीतकोणतीही जीवितहानी झालेली
नाही. एसटी बस मधील ६० प्रवासी थोडक्यात बचावले.मुंबई – परळ येथून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण – सावर्डे येथे गणेशोत्सवासाठी जादा एसटी बसने चाकरमानी गावी
येत होते . मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव जवळच्या
वडपाले येथे सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एसटी बस आली असता आग लागली. बस चालकाने प्रसंगावधान राखून
एसटी बस रस्त्याच्या कडेला उभी करून
सर्व प्रवाशांना सुखरुप खाली उतरवले. त्यामुळे बस
मधील सर्व ६० प्रवासी थोडक्यात बचावले.
मात्र गावी येत असलेल्या प्रवाशांचे सर्व सामान जळून
गेले .या घटनेनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक
विस्कळीत झाली.महामार्गावरील दोन्ही बाजूची
वाहतूक काही वेळ थांबवण्यात आलीहोती. त्यामुळे मोठी वाहतूककोंडी झाली आहे. महामार्गावर ३
किमीपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here