आम.प्रणिती शिंदेच्या विरोधात अटक वॉरंट !

0
833

सोलापूर : न्यायालयाच्या तारखेला हजर न राहिल्याने सोलापूरमधील काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना जिल्हा न्यायालयातर्फे जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली 2 जानेवारी 2018 रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठक सुरु असताना एकीकडे आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासकीय रुग्णालयातील प्रश्नांसाठी आंदोलन करण्यात आलं. याचवेळी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी हे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला असता कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत हुज्जत घातली होती. यामध्ये पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह नऊ जणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here