आकूर्ङे येथील त्रिमूर्ती विकास सेवा संस्थेच्या सभासदानां ५% टक्के लाभांश

0
120

गारगोटी/प्रतिनिधी
त्रिमूर्ती विकास सेवा संस्थेने गेल्या १० वर्षात काटकसरीने कारभार केल्याने आज सभासदांना ५ टक्केप्रमाणे लाभांश दिला असून असेच कामकाज केल्यास भविष्यात या संस्थेचा वटवृक्ष झालेला आपणास पहायला मिळेल असे प्रतिपादन बाजार समिती संचालक व भाजपा भुदरगड तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले.आकुर्डे ता. भुदरगड येथील त्रिमुर्ती सह.विकास सेवा संस्थेच्या ११ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते, अध्यक्षस्थानी संस्था चेअरमन रविंद्र पाटील हे होते…
यावेळी बोलताना श्री. पाटील पुढे म्हणाले त्रिमुर्ती विकास संस्थेने भविष्यकाळात विविध सभासदांचा हितासाठी लोकोपयोगी व्यवसाय सुरु करून संस्थेच्या प्रगतीत भर टाकावी.यावेळी सभासदांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना संचालक मंडळाने समर्पक उत्तरे दिली. तर संस्थेच्या कामकाजाची यशस्वी १० वर्षे पूर्ण केल्याबद्दल प्रत्येक कर्जदार सभासदाला जाजम भेट देण्यात आले.
यावेळी बाजीराव पाटील, शामराव पाटील,कृष्णात पोवार, दिलीप शेणवी, सुरेश कुंभार, तुकाराम शेणवी, धनाजी पोवार,भिमराव भंडारी या सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला.यावेळी संचालक नामदेव पाटील, रामचंद्र शेणवी, आनंदा कुंभार, ज्ञानदेव कुंभार, सिताराम पोवार, धनाजी कांबळे, युवराज लोहार, रमेश भोसले यांचे सह संचालक व सभासद मोठ्या संखेने उपस्थित होते.प्रारंभी स्वागत व्हा. चेअरमन सुरेश सुतार यांनी केले, तर आभार सचिव सचिन शिंदे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here