राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार अडचणीत येण्याची शक्यता !

0
196

मुंबई – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेही अडचणीत येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी एमआरए पोलीस ठाण्यात भारतीय. दं. वि. कलम ४२०, ४०९, ४०६, ४६५, ४६७, ४६८, ३४, १२० (ब) अन्वये सर्वपक्षीय 76 नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहेत. या घोटाळ्यात संबंधित खात्याचे अधिकारी आणि तत्कालीन मंत्र्यांची नावंही आरोपी म्हणून देण्यात आल्याचा दावा तक्रारदाराच्या वकिल माधवी अय्यपम यांनी केला आहे. त्यामुळे तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला (ईवोडब्ल्यू) दिले होते.त्यानुसार २५00 कोटींच्या कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार, हसन मुश्रीफ, आनंदराव अडसूळ, विजयसिंह मोहिते-पाटील आणि शिवाजीराव नलावडे यांच्यासह अन्य बड्या नेत्यांविरोधात माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित पवारांसह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. याप्रकरणी एमआरए पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४२०, ४०९, ४०६, ४६५, ४६७, ४६८, ३४, १२० (ब) अन्वये 76 जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here