इलेक्ट्रीक वाहनांसाठी 2030 पर्यंतची मुदत मागे

0
756

नवी दिल्ली : इलेक्ट्रीक वाहनांसाठी 2030 पर्यंतची मुदत देणाऱ्या केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी माघार घेतली आहे. गडकरींचे बुलडोझरचे वक्तव्य गेल्या वर्षी गाजले होते. वाहन कंपन्यांना इंधनावरील गाड्यांवरून इलेक्ट्रीक गाड्यांकडे वळण्यासाठी गडकरी यांनी इशारा दिला होता. मात्र, सध्याची वाहन कंपन्यांची अवस्था पाहता गडकरी नरमल्याचे दिसत आहे.वाहन कंपन्यांना इलेक्ट्रीक वाहनांकडे वळण्यासाठी नीती आयोगाने मुदत दिली होती. अशा प्रकारचा प्रस्ताव आयोगाने दिला होता. यामुळे देशातही तसे वातावरण निर्माण झाले आणि वाहनांच्या विक्रीला लगाम बसला.याचा फटका वाहन कंपन्यांना बसला. त्यातच बीएस-६ मानांकनामुळे कंपन्यांना इंजिने विकसित करण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागला. यामुळे वाहन क्षेत्र सध्या मोठ्या परिवर्तनातून जात आहे. याचा एकत्रित परिणाम विक्रीवर झाल्याने लाखो नोकऱ्या धोक्यात आहेत.यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलासादायक वक्तव्य केल्यानंतर नितीन गडकरींच्या मंत्रालयानेही इलेक्ट्रीक वाहनांसाठी कोणतीही डेडलाईन नसल्याचे म्हटले होते. ईटीमध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार गडकरी यांनी बुधवारी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी इलेक्ट्रीक वाहने बाजारात आणण्यासाठी कोणतीही डेडलाईन निश्चित केली नसल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here