छत्रपती उदयनराजे भाजपच्या वाटेवर !

0
764

मुंबई:राष्ट्रवादीला रामराम करणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच आता साताराचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर ते हा निर्णय घेत असल्याचे बोलले जात आहे. भाजपाच्या या प्रयत्नांना जर यश आले तर शरद पवारांना हा मोठा धक्का असू शकतो. शिवाय हक्काचा सातारा जिल्हा देखील राष्ट्रवादीच्या ताब्यातून गेल्यात जमा होऊ शकतो.मुख्यमंत्र्यांबरोबर मंगळवारी सायंकाळी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असल्याचे एबीपी माझाकडून सांगण्यात आले आहे. खासदारकीचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढवण्याची देखील उदयनराजेंची तयारी असल्याचे सांगण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here