कोल्हापूरतील जनजीवन अद्यापही विस्कळीत

0
189

कोल्हापूर प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्हातील महापुराचा विळखा आता झपाट्याने कमी होऊ लागला आहे.बहुतांश भागातील पाणी मोठ्या प्रमाणात ओसरत आहे.पूरग्रस्त भागात आता स्वच्छता आणि साथीच्या रोगाच्या निर्मुलनचे काम चालु झाले आहे. पण शहर आणि परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. पेट्रोल टंचाई पण आहे.पुणे- बंगलोर महामार्ग सुरु झाला असुन वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. शहराचे जनजीवन आता पुर्व पदावर येत आहे.
गेल्या आठवड्याभर कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने कहर माजवला होता. पंचगंगेने कोल्हापूर शहरसह अनेक गावे वेढली होती. शनिवार पासुन पाऊसाचा जोर कमी झाला आणि पुराचे पाणी ओसरु लागले.त्यामुळे मदत कार्यात कमालीचा वेग घेतला आहे. शहरासह ग्रामीण भागातील पाणी मोठ्या प्रमाणात ओसरू लागल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे आवाहन प्रशासनासमोर आहे. शहरातील लक्ष्मीपुरी,व्हिनस काॅर्नर, शाहूपुरी अन्य पूरग्रस्त भागात प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवली आहे. रस्त्यावर साचलेला गळ काढण्यासाठी पाण्याचे फुवारे मारले जात आहेत. या कामात महानगरपालिका प्रशासन पथके व स्वयंसेवा संस्था सहभागी झाल्या आहेत. पाणी ओसरले तरी अनेक रस्त्यावर १ते२फुट गळ व चिखल साचला आहे.घरामध्ये साचलेले पाणी व गळ काढण्याचे काम लोक करत आहेत.तात्पुरत्या मदत केंद्रामध्ये वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत.यामध्ये अनेक डाॅक्टर ची पथके कार्यरत असल्याचे दिसते.शहरामध्ये केएमटी तर ग्रामीण भागात एस.टीसह खाजगी प्रवासी वाहतुक काही प्रमाणात चालु झाली आहे. भाजीपाला व दुधाची आवक काही प्रमाणात चालु झाली असली तरी तुटवडा जाणवत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here