राज्यातील पूरग्रस्तांसाठी 6800 कोटी रुपयांची केंद्राकडे मागणी- मुख्यमंत्री

0
146

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती पाहता एकूण 6800 कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार तसेच नौदल, वायू दल, एनडीआरएफ या सर्वांचे आभार मानले. जेवढी मदत मागितली तेवढी उपलब्ध करून देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
2005 शी तुलना केली तर अभूतपूर्व पाऊस थोड्या कालावधीत पडला आहे. प्राथमिक माहितीनुसार आलेला अहवाल आपण केंद्राला पाठवत आहोत. याचे दोन भाग करत आहोत. कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रच्या भागसाठी 2105 कोटी रुपयांची मागणी करत आहोत. तर कोल्हापुर, सांगली आणि सातारा यासाठी 4700 कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here