गारगोटी/प्रतिनिधी
बामणे (ता.भुदरगड) येथिल माजी सैनिक विठ्ठल गुंडु कांबळे (वय ४०) या नराधम पित्याने अकरा वर्षाच्या पोटच्या मुलीला जबर मारहाण केल्याने या मारहाणीत तिचा मृत्यू झाला आहे.पूजा विठ्ठल कांबळे (वय 11) असे मृत दुर्दैवी मुलीचे नाव आहे.
याबाबतची फिर्याद मृत पुजाची मावशी आरती चंद्रकांत कांबळे(रा पाल ता भुदरगड)यांनी भुदरगड पोलिसात दिली आहे. पोलीस आणि ग घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी बामणे येथील माजी सैनिक विठ्ठल कांबळे याच्या जाचाला कंटाळून पहिली पत्नी विद्या ही दहा वर्षांपासून तिचे माहेर शेळेवाडी ता राधानगरी येथे राहते. .तिला तीन मुली होत्या.पहिल्या दोन मुली वडिलांसोबत रहात आहेत.तर सर्वात लहान असलेली पूजा ही आपल्या आईकडे रहात होती.तिला गेल्या मार्च महिन्यात विठ्ठल याने आपल्यासोबत राहण्यासाठी आणले. त्यामुळे तो त्याची दुसरी पत्नी, तीन मुली, एक मुलगा, आई वडील, भाऊ असे एकत्र रहात होते.
गेल्या मार्च महिन्यात पहिल्या पत्नीकडे असलेल्या पुजा हिचा सांभाळ करण्यासाठी घरी आणले होते. ती पाचवीच्या वर्गात शिकत होती. घरी आणल्या पासून पूजा ” मला आईकडे पाठवा ” असा तगादा वडिलांकडे लावत होती .तिच्या या मागणीमुळे वडील पुजाला सापत्नपणाची वागणूक देत होता. तिला तो वारंवार जबर मारहाण करीत असे .दोन दिवसांपूर्वी विठ्ठल याने पूजाला जबर मारहाण केली होती.पण तिच्यावर उपचार न केल्याने तिचा रात्री जीव गेला असावा.शुक्रवारी सकाळी पुजा ही मयत झाल्याची आढळून आले .
यावेळी तिच्या शरीरावर मारहाण झाल्याच्या मोठ्या प्रमाणात व्रण व जखमा दिसुन येत होत्या. विठ्ठल याने केलेल्या गंभीर मारहाणीतच पुजा हिचा मृत्यू झाल्याचे बातमी गावभर पसरली. तो पुजा हिचा अंत्यसंस्कार करण्याच्या तयारीत असतानाच पोलीस पाटील यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली त्यामुळे तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पूजाच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्याचे दिसून येत होते. तोंडात कापडाचा बोळा घालून मारहाण झाल्याने तोंडातून रक्त आल्याचे दिसत होते. शरीरावर काठीने व पट्ट्यातील मारहाण केलेल्या जखमा आणि व्रण दिसुन येत होते.
पुजा हिचा वडलांनी केलेल्या मारहाणीतच मृत्यू झाल्याने गावातील ग्रामस्थ संतप्त झाले होते. पोलिसांनी विठ्ठलला मुलीला का मारलेस? असे विचारले असता वेगवेगळी कारणे सांगत होता. अधिक तपास भुदरगड पोलीस निरीक्षक संजय पतंगे करीत आहे.