मोरस्करवाडी येथील घरांची पडझड सुमारे २ लाखांचे नुकसान

554

गारगोटी/प्रतिनिधी :-
भुदरगड तालुक्यात वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे अनेक गावांचे नुकसान झाले आहे .
मिणचे बु पैकी मोरस्करवाडी ता.भुदरगड येथील श्रीपती सुभाना करवळ ,गणपती शंकर कांबळे, पांडुरंग शंकर मोरस्कर, यशवंती राजाराम कडव, सुनंदा विष्णू मोरस्कर यांच्या घरांची मोठया प्रमाणात पडझड झाली असून सुमारे २ लाखाचे नुकसान झाले असल्याचे माहिती गावातील नागरिकांनी स्थानिक चौकशी करून दिली .गेल्या वर्षी ही या गावातील लोकांच्या घराची छप्परे जोराच्या वादळी वाऱ्याने उडून गेली होती त्या मुळे या गावतील नागररिकाना आर्थिक भुर्दंड बसला होता. आणि या वेळी ही जोरदार पाऊस व वाऱ्याने मुळे गावतील अनेक घरांची पडझड झाली असून या पडझडीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले त्यामुळे अनेक संसार उघड्यावर पडले आहे. या सर्व घरांचे पंचनामे सरपंच सचिन गुरव तलाठी शिंदे मॅडम ग्रामसेवक एस डी पाटील पोलीस पाटील वैशाली गुरव यांनी पंचनामा केला. शासनाकडून याना ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.