बालिंगा पुलास भेग नव्हे तर प्रसरण गॅप ; निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांचा खुलासा

10058

कुडीत्रे:
बालिंगा पुलास भेगा असे वृत्त न्यूजमराठी२४ ने प्रसिद्ध करताच शासन यंत्रणा खळबळू न जागी झाली. जिल्ह्याचे तत्पर निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी चौकशी करून तातडीने न्यूजमराठी२४ कडे खुलासा केला आहे की,बालिंगा पूल हा 5 गाळ्यांचा दगडी कमानी पध्दतीचा आहे तथापि या पूलास आर सी सी काँक्रीट पध्दतीचा स्लॅब आहे. काम सूरू असताना तसेच उन्हाळ्यात काँक्रीट चे प्रसरण (Expansion) होऊन त्यामुळे काँक्रीट मध्ये ताण निर्माण होऊ नये यासाठी पुलाच्या प्रत्येक दोन गाळ्यामध्ये 25 मिमी ची प्रसरण गॅप ठेवलेली असतेच. सदर ची गॅप हीच आहे.या खुलाश्यामुळे लाखो लोकांना दिलासा मिळाला आहे.