2022 पर्यंत सर्व बेघरांना घर देण्यात येणार :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
200

शिर्डी : शिर्डीमध्ये आज सरपंच आणि उपसरपंचांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, विजय औटी यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी 2022 पर्यंत सर्व बेघरांना घर देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. तसंच या वर्षाच्या अखेरपर्यंत 30 हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.’2022 पर्यंत सर्व बेघरांना घर देण्यात येणार आहे. देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष पूर्ण होईल त्यावेळी राज्यात प्रत्येकाला घर मिळणार, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here