भाजपच्या ‘महाजनादेश यात्रेनंतर राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य’ यात्रा,खा. अमोल कोल्हे करणार सुरवात

0
213

मुंबई, 31 जुलै- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. राष्ट्रवादी राज्यभर शिवस्वराज्य यात्रा काढणार आहे. येत्या 6 ऑगस्टला शिवस्वराज्य यात्रेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर प्रारंभ होणार आहे.विशेष म्हणजे या यात्रेचे नेतृत्त्व राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार आणि टीव्ही अभिनेते डॉ. अमोल कोल्हे करणार आहे. याशिवाय खासदार उदयनराजे भोसले हे देखील शिवस्वराज्य यात्रेत ठिकठिकाणी स्टार कॅम्पेनर म्हणून सहभागी होणार आहेत. दररोज तीन विधानसभा मतदार संघात शिवस्वराज्य यात्रा पोहोचेल. शिवाजी महाराजांचे आजोळ आणि जिजाऊंच्या जन्मस्थळ म्हणजेच बुलडाण्यातील सिंदखेळराजा येथे यात्रेचा पहिला टप्प्याचा समारोप होईल, तर यात्रेचा दुसरा टप्पा 16 ऑगस्टपासून तुळजापूर येथून सुरू होणार आहे. या संपूर्ण यात्रेची मदार युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसवर सोपवण्यात आली आहे. दरम्यान, येत्या एक ऑगस्टपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला मोझरी (ता.तिवसा) येथून प्रारंभ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here