कॅफे कॉफी डे चे मालक व्ही.जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू !

255

मंगळुरू, 31 जुलै: कॅफे कॉफी डे (CCD)चे मालक व्ही.जी. सिद्धार्थ यांच्यासंदर्भातील धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. सोमवारी (29 जुलै) संध्याकाळपासून बेपत्ता असलेल्या सिद्धार्थ यांचा अखेर मृतदेह सापडला आहे. नेत्रावती नदीमध्ये सिद्धार्थ यांचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या 72 तासांपासून त्यांचा शोध सुरू होता. मिळालेल्या माहितीवरून, सिद्धार्थ यांनी व्यावसायिक तोट्यामुळे आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचलल्याचं उघड झालं आहे. नेत्रावती नदीच्या पुलावरून सिद्धार्थ यांनी नदीत उडी घेऊन जीव दिल्याचं म्हटलं जात आहे. सिद्धार्थ हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते एसएम कृष्णा यांचे जावई होते. या घटनेमुळे सिद्धार्थ यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.