रेशनिंगच्या दुकानात रांगा लागायच्या तशा रांगा भाजप, शिवसेनेच्या बाहेर :उद्धव ठाकरे

0
254

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपनं लोकसभा निवडणूक 2019 मध्ये घवघवीत यश मिळवलं. भाजपचं यश पाहता यानुसार देशभरात भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही शिवसेना-भाजपत राष्ट्रवादी-काँग्रेसमधून जोरदार प्रवेश पाहायला मिळत आहे. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सणसणीत टोला हाणला आहे.’पूर्वी दसरा–दिवाळीस रवा, साखर, तेलासाठी रेशनिंगच्या दुकानात रांगा लागायच्या तशा रांगा भाजप, शिवसेनेच्या बाहेर लागल्या आहेत. महाराष्ट्रात पक्षांतराचे रेशनिंग सुरू आहे, पण रेशनिंग दुकानात पूर्वी व्हायचा तसा काळाबाजार येथे नाही. राजकारणात फोडा, झोडा व राज्य करा या ब्रिटिश नीतीचा अवलंब जिल्हा परिषदांपासून ते राज्याच्या विधानसभा, लोकसभेपर्यंत अवलंबणारे काँग्रेसवालेच होते. शिवसेना–भाजपसही या ‘अच्छे दिना’ची कोवळी किरणे आता मिळत असतील तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने घामाघूम होण्याचे कारण नाही’,अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here