मुंबई अध्यक्षपदावरून राष्ट्रवादी मध्ये मतभेद, नवाब मलिक यांच्या नावाची चर्चा

0
161

मुंबई- एकीकडे राष्ट्रवादीत गळती लागली असताना पक्षातील राजकारण मात्र थांबताना दिसत नाही. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन हाती शिवधनुष्य पेलले आहे. अहिर आता शिवसेनेच्या गोटात सामिल झाले आहे.तर दुसरीकडे दिल्लीत मुंबई अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मजीद मेमन आणि विद्या चव्हाण यांच्या नावाला पसंती दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी मलिक यांच्या निवडीस तुर्तास लाल दिवा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबई अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here