योग्य शिक्षण व संस्कार हे गुरुच करू शकतात : सरपंच सौ अपर्णा पाटील

0
297

कोल्हापूर:
प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे महत्त्व आहे.गुरुशिवाय माणूस योग्य दिशेने पुढे जाऊच शकत नाही.आणि याच गुरुजनांच्या आदरातिथ्याचा गुरुपौर्णिमा कार्यक्रम विद्यामंदिर वरणगे ता करवीर येथे पार पडला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील सेवानिवृत्त शिक्षक श्री रामचंद्र कुंडले,आनंदराव सुतार,एस टी सुतार यांचा झाड देऊन गौरव करण्यात आला.तसेच आरोग्यसेवक सचिन भोसले यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून सरपंच सौ अपर्णा पाटील उपस्थित होत्या. यावेळी त्या म्हणाल्या हिंदू संस्कृती मध्ये गुरूंना अनन्य साधारण महत्व आहे तसेच योग्य शिक्षण व संस्कार हे गुरुच करू शकतात.कार्यक्रमाला उपसरपंच सौ भारती पोवार ,ग्रामपंचायत सदस्य,शालेय व्यवस्थापन कमिटी सदस्य , विद्यार्थी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन श्री अमर पाटील सर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here