आम्हीही पंढरीचे वारकरी ! स्वमग्न मुलांनी साजरी केली अनोखी दिंडी

0
246

कोल्हापूर:
आषाढी एकादशीला सर्व जाती-जमातींना भक्ती प्रेमाच्या रसात न्हाऊन निघणारा वारकरी संप्रदाय दिंडीत पहायला मिळतो पण कोल्हापूरात, केवळ स्वमग्न (ऑटिझमग्रस्त) मुलांकरता, अमन फाऊंडेशनने सुरू केलेल्या ‘केअर’ स्वमग्न विकास केंद्राने (सेंटर आॅफ आॅटीझम रिसोर्सफुल एज्युकेशन ) या स्वमग्न मुलांची आगळीवेगळी दिंडी काढली. या निमित्ताने वारकरी वेशातील स्वमग्न मुलांनी दुर्लक्षित असलेल्या स्वमग्नता या विषयावर जनजागृती केली.संवाद साधताना, भावना प्रकट करताना येणाऱ्या अडचणी, स्पर्श, वास, आवाज, चव याबाबतची अतिसंवेदनशीलता, सामाजिक जाणिवांचा अभाव ही स्वमग्न मुलांची प्रामुख्याने आढळणारी लक्षणे आहेत.समाजात या बाबतची जागृती नसल्याने बरेचदा मतिमंद समजून या मुलांच्या असामान्य क्षमतांकडे दुर्लक्ष केले जाते.”मीही दिसतो तुमच्यासारखाच पण तरीही वेगळा”, “मी आजचा ऑटिस्टिक, उद्याचा जीनियस”, “आम्ही वारकरी वेगळे, प्रेम आणि शिक्षणाचा अधिकार” अशा प्रकारचे अनेक ऑटिझमविषयक जनजागृतीपर फलक घेऊन दिंडी संपन्न झाली. या उपक्रमासाठी ‘केअर’ केंद्राच्या विशेष शिक्षिका मानवी जोशी, धनश्री दळवी, आशा मसुटे, संगीता हालके यांनी विशेष परिश्रम घेतले. उपक्रमास अमन फाउंडेशन च्या दीपा शिपूरकर, शिवकुमार पेडणेकर, संदीप पाटील यांचे सहाय्य लाभले. या वेळेस मुलांचे पालक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here