राधानगरी विधानसभा कॉग्रेसला मिळणार ?

0
886

गारगोटी /नितीन बोटे
राधानगरी ,भुदरगड ,आजरा या अडीच तालुक्याचा हा मतदार संघ तयार करण्यात आला या मतदार संघाचे आमदार नेहमी कॉग्रेस च्या विचाराचे होऊन गेले अपवाद मागील निवडणुकीत कॉग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी राहून या मतदार संघावर शिवसेनेचा फगवा फडकवला .2019 ची विधानसभा निवडणूक जवळ आली आहे .राज्यात युती व आघाडीची चर्चा सुरू आहे .युती झाली तर ही जागा शिवसेनेला जाणार आहे तर कॉग्रेस -राष्ट्वादी कॉग्रेस आघाडी झाली तर ही जागा कोणाला मिळणार याकडे संपूर्ण मतदार संघाचे लक्ष लागून राहिले आहे.गेल्या 2 पंचवार्षिक निवडणुकीत ही जागा राष्ट्वादी कॉग्रेस ला गेली होती .मागील निवडणुकीत कॉग्रेस -राष्ट्वादी कॉग्रेस वेगळी लढली यावेळी माजी आमदार बजरंग देसाई यांना कॉग्रेस चे अधिकृत तिकीट
मिळाले असतानाही त्यांना या मतदार संघातून माघार घ्यावी लागली .व त्यांनी राष्ट्वादीचे उमेदवार के पी पाटील यांना गारगोटी येथे मेळावा घेऊन जाहीर पाठींबा दिला होता .तर राधानगरीतून कॉग्रेस नेते या अभिजित तायशेटे, सदाशिव चरापले,हिंदुराव चौगले, पी डी धुदरे,कै .आण्णासो नवणे,सुधाकर साळोखे,विजयसिह मोरे यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रकाश अबीटकर यांना मदत करून विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. पण आता कॉग्रेस -राष्ट्वादी कॉग्रेस आघाडी होणार आहे .कॉग्रेस 7 तर राष्ट्वादी कॉग्रेस 3 असा जागावाटपाचा मागील फॉर्म्युला नुसार जागा वाटप होणार आहे .माजी आमदार पी एन पाटील यांच्या निवासस्थानी कॉग्रेस पक्षाच्या नेत्यांची बेठक झाली यावेळी जिल्हाध्यक्ष माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी मंत्री आमदार सतेज पाटील ,माजी आमदार पी एन पाटील,माजी मंत्री जयवंतराव आवळे प्रमुख उपस्थिती ही बेठक पार पडली यावेळी राधानगरी मतदार संघ कॉग्रेस पक्षाकडे घ्यावा व या बदल्यात शाहूवाडी -पन्हाळा राष्ट्वादी कॉग्रेस पक्षाला सोडावा याविषयी एकमत झाल्याचे समजते .कॉग्रेस पक्षाकडे राधानगरीतून गोकुळ चे माजी अध्यक्ष अरुण डोगळे ,भोगावती चे माजी चेअरमन उदयसिह पाटील कौलवकर इच्छुक आहेत तर भुदरगड मधून माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे पुत्र माजी उपसभापती सत्यजितदादा जाधव इच्छुक आहेत .अरुण डोगळे व सत्यजित जाधव यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केली आहे .या राधानगरी मतदार संघात भुदरगड ,आजरा ,राधानगरी तालुक्यात सतेज टीम कॉग्रेस चे काम पाहत असल्याने राधानगरी ची जागा कॉग्रेस पक्षाला मिळाल्यास या मतदार संघात निश्चितच परिवर्तन पाहायला मिळणार यात शंका नाही .आता कॉग्रेस -राष्ट्वादी कॉग्रेस आघाडीची जागा कोणत्या पक्षाला मिळते यावर कार्यकर्त्याचे लक्ष लागून राहिले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here