अनिल अंबानी यांच्या उद्योग समूहावर कर्जाचा मोठा बोजा

0
138

मुंबई – अनिल अंबानी यांच्या उद्योग समूहावर कर्जाचा मोठा बोजा वाढला आहे. आता अंबानी यांनी कर्ज कमी करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी ते मालमत्ता विकत आहेत. त्यामध्ये रस्त्यापासून, रेडिओ स्टेशनचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या मुख्यालयातील इमारतीमधील काही भाग लीज करण्याचे ठरविले असल्याचे वृत्त आले होते.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्‍चर ही कंपनी आपले नऊ रस्त्याचे प्रकल्प विकून 900 कोटी उभा करण्याचा प्रयत्न करीत आहे.
रिलायन्स कॅपिटलकडे सध्या रेडिओ युनिट आहे ते विकून बाराशे कोटी रुपये मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांमधील काही भागभांडवल विकून हे 1 हजार 150 कोटी रुपये उभा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here