१४९ वर्षानंतर भारतात दिसणार असे ‘चंद्रग्रहण’

0
147

मुंबई:
भारतातून १७ जुलै २०१९ रोजी खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री १ वाजून ३१ मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहण सुरू होईल , अशी माहिती भूविज्ञान मंत्रालयाने दिली. खंडग्रास चंद्रग्रहण सुरु होताना पृथ्वीच्या छायेने चंद्र हळूहळू झाकला जाईल. तर खंडग्रास चंद्रग्रहणाचा परमोच्च बिंदू ३ वाजून १ मिनिटांनी असेल. या क्षणी चंद्राचा अर्ध्याहून अधिक भाग पृथ्वीच्या छायेने झाकला जाणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी ग्रहण सुटेल , अशी माहिती यावेळी देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here