पाकने कुरघोड्या केल्यास, तर त्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल : लष्कर प्रमुख रावत

0
56

यूएनाय:
पाकने कुरघोड्या केल्यास, तर त्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असा सज्जड दम लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला. कारगील युद्धाला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
लष्करप्रमुख रावत पुढे म्हणाले की, भारतीय लष्कर देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सदैव जागृक आहेत. उरी आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे आपल्या देशाच्या राजकीय आणि लष्करी ताकदीचे प्रतिबिंब सा-या जगात उमटले आहे.
यावेळी रावत यांनी लडाखच्या डेमचेक सेक्टरमध्ये चिनी सैनिकांकडून घुसखोरी झाली नसल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here