अकरावीची पहिली यादी जाहीर ;आर्टस्, कॉमर्सने यंदाही सायन्सला मागे टाकले!

0
146

मुंबई:
अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर झाली असून आर्टस्, कॉमर्सने यंदाही सायन्सला मागे टाकले आहे. सायन्सपेक्षा आर्टस् आणि कॉमर्सचा कटऑफ चढा असल्याचे या यादीतून स्पष्ट झाले. मुंबईतील नामांकित एचआर, केसी, जयहिंद, रुईया, मिठीबाई, झेवियर्स या कॉलेजच्या आर्टस् शाखेचा कटऑफ हा सायन्स शाखेच्या कटऑफपेक्षा 1 ते 8 टक्क्यांनी अधिक आहे.
यंदाच्या गुणवत्ता यादीत सायन्स शाखेचा सर्वाधिक कटऑफ हा वाशी येथील फादर ऍग्नेल मल्टिपर्पज कॉलेजचा आहे. या कॉलेजची कटऑफ 93.4 टक्के असून यंदा प्रथमच या कॉलेजने माटुंगा येथील रुईया कॉलेजलाही मागे टाकले आहे. रुईयाची सायन्सची कटऑफ 91 टक्क्यांवर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here