गारगोटी शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे मुजवण्यास सुरवात ; जीवनदादा पाटील यांच्या निवेदनाला यश

0
576

गारगोटी / प्रतिनिधी
गारगोटी पाटगाव राज्य मार्गावरील गारगोटी येथील जोतिबा चौक ,आझाद चौक परिसरातील रस्त्यावरून गाडी चालवताना वाहनधारकांना त्रास होत होता .या रस्त्यावर खड्डड्याचे साम्राज्य पसरले होते .याबाबत *जी प सदस्य* *जीवनदादा पाटील* यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाला निवेदन देऊन खड्ड्यात झाडे लावणार असे सांगीतले होते याची सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दुसऱ्या दिवशी दखल घेऊन खड्डे मुजवण्यास सुरवात केली आहे . अवजड व मोठ्या वाहनांनी या रस्त्यावर खड्डे निर्माण केले आहेत. याच रोडवरून मौनी विधापीठ मधील शाहू कुमार भवन ,जवाहर लाल बाल भवन ,कुमार विध्या मंदिर अशा विविध शाळा ना व कॉलेज ला विध्याथ्याना जावे लागते यावेळी रस्त्यावरून जाताना एखादी एसटी वा मोटर सायकल जवळून गेली की खड्ड्यातील चिखल वा पाणी त्यांच्या युनिफार्मवर उडले जाते त्यांच्या युनिफार्मवर खराब होत होता.खड्डे मुजवण्यास सुरवात केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे .एका लोकप्रतिनिधींच्या निवेदनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली व दखल घ्यावी लागली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here