मोदी सरकार आता थेट बँक खात्यात जमा करणार सबसिडी

0
357

नवी दिल्ली:
केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेत आता ७०,००० करोड रुपयांपेक्षा अधिक खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्याला घेऊन मोठे पाऊल टाकले आहे. सरकारने यासाठी ३ नव्या तंत्रज्ञानांवर काम सुरु केले आहे. नव्या तंत्रज्ञानाने राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तरावर खत पुरवठा, उपलब्धता आणि आवश्यकता यांचा सर्व तपशील एकाच डॅशबोर्डवर मिळेल. याची माहिती देताना सचिव छबीलेंद्र राउल म्हणाले की, ‘सरकारने पीओएस सॉफ्टवेअर एडिशन 3.0 विकसित केलं आहे. यात रजिस्ट्रेशन आणि लॉग इन दरम्यान आधार व्हर्चुअल ओळखीचा ऑप्शन तसेच वेगवेगळ्या भाषांचा पर्यायही असेल.त्यांनी सांगितले की, यात मृदा आरोग्य कार्ड शिफारशीची तरतूदही असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here