झाडे जगवा जीवसृष्टी चा विनाश रोखा: सुभाष माने

0
99

गारगोटी ( प्रतिनिधी) आगामी काळात झाडे वाढवून ती जगवली नाही तर २०३० सालापर्यंत जीवसृष्टी च्या विनाशाची भिती पर्यावरण शास्त्रज्ञानी व्यक्त केली आहे. यासाठी सर्वांनी कोणत्याही परिस्थीतीत सक्तीने झाडे लावून आगामी काळातील जीवसृष्टीच्या या विनाशाचे भिषण संकट रोखा असे आवाहन साप्ताहिक टाईम्स ऑफ भुदरगड चे संपादक सुभाष माने यांनी व्यक्त केले.ते आकुर्डे येथील वनक्षेत्रात वृक्षलागड कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.गावच्या सरपंच सुहासिनी भांदिगरे या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थीत होत्या.आकुर्डे ग्रामपंचायत व अशी पाखरे येती व्हाट्सअँप ग्रुच्या संयुक्त विद्यमाने या वृक्षलागवड मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.संपादक सुभाष माने पुढे म्हणाले की आजघडीला सर्वांच्यात म्हणावी तशी जंगल जीवनाबध्दल आस्था दिसत नाही. झाडांच्या संगोपनाकडे सर्वजन दुर्लक्ष करतात. त्यामुळे दरवर्षी लावत असलेली लाखो झाडे परत त्याच ठिकाणी लावण्याची वेळ येते. जनतेच्या कराचा पैसा वाया जातो. जनताच हा पैसा घालवते. आता काळ क्षमा करणार नाही. यापुढील काळात डोळसपणाने या वृक्ष संवर्धनाकडे जाणीवेने पाहिले पाहिजे.जागतिक स्तरावर आता मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड ची चळवळ उभी राहात आहे. सर्वांना कळून चुकले आहे की एक डीग्रीही तापमान वाढून चालणार नाही.यासाठी सर्वांनी जागृत राहायला हवे. झाडे जगवायला हवीच.जंगलांच्या आगी रोखा,आजच्या बालकांचे भविष्य उज्वल करा.झाडे लावून जीवसृष्टी वाचवण्याचा हाच एक उपाय आहे.यावेळी वनक्षेत्रपाल संदेश पाटील, गोकूळ चे माजी संचालक दौलतराव जाधव, सा बा चे निवृत्त उपअभियंता आर के देसाई, राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे तालुकाअध्यक्ष पी एस कांबळे, उपसरपंच रविंद्र पारकर, ग्रा प सदस्या सौ कुपटे, वनपाल शैलेश शेवडे, नाना मगदुम, साप्ताहिक टाईम्स ऑफ भुदरगड च्या कार्यकारी संपािदका सविता माने, वाईल्डलाईफ फोटोग्राफर विजय पाटील, सर्पमित्र अवधूत पाटील, शशिकांत जगताप, प्रसाद आबीटकर, वनरक्षक सुरेखा लोहार, बजरंग शिंदे ,नंदकुमार खराडे वनमजूर तानाजी माणगांवकर, विलास पोवार, शामराव देसाई आदि मांन्यवर व सदस्य उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here