गारगोटी-पाटगाव रस्ता दुरुस्त करावा अन्यथा आंदोलन-जि प सदस्य जीवन पाटील यांचा बांधकाम खात्याला इशारा

0
345

गारगोटी ता.११ (प्रतिनिधी)गारगोटी ते पाटगाव या मार्गावर गारगोटी शहरात मोठे खड्डे पडले असून या रस्त्याची दुरुस्ती करावी ,अन्यथा रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून आंदोलन करण्याचा इशारा जि. प. सदस्य जीवनदादा पाटील यांनी आज सार्वजनिक बांधकाम खात्याला एका निवेदनाद्वारे दिला.
निवेदनात म्हटले आहे की, गारगोटी पाटगाव या रस्त्यावरून पाटगाव व इतर ठिकाणी मोठयाप्रमाणात पर्यटक प्रवास करत असतात,शिवाय याच रस्त्यावर गारगोटी येथे मौनी विद्यापीठ असलेने शाळा, कॉलेजचे विद्यार्थी येथून जा-ये करतात,या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले असलेने लहान मोठे अपघात होत आहेत,शिवाय मोठ्या खड्डयांमुळे विद्यार्थ्यांचे अंगावर वाहनाचे पाणी,घाण उडत आहे,त्यामुळे विद्यार्थ्यांचे गणवेश खराब होत आहेत,शिवाय वाहनाचे पाणी अंगावर उडालेने किरकोळ वाद,भांडण निर्माण होत आहे, त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी करून हे खड्डे लवकर बुजवावेत अन्यथा रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावणेचा इशारा देणेत आला आहे. यावेळी निवेदन देताना रमेश देसाई,रंगराव देसाई,पांडुरंग शिंदे,किशोर हिलगे, (गारगोटी)सदाशिव,हळदकर,संदीप पाटील,(कुर)अभिजित किल्लेदार (ठिकपुर्ली)तानाजी माने (हेदवडे) आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here