भुदरगड तालुक्यात मुसळ″धार-वेदगंगा नदीला महापूर-जनजीवन विस्कळीत

0
686

गारगोटी ता.११ (प्रतिनिधी)भुदरगड तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून धरणक्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भुदरगड तालुक्यातील वेदगंगा नदीला महापूर आला आहे.. पाटगाव व चिकोत्रा नदीवरील चिकोत्रा धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.या धुवांधार पावसाने भुदरगड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेल्या आठवड्यापासून पावसाचे पुनर्वसू (तरणा) नक्षत्र चालू झाले आहे, या नक्षत्रात गेल्या काही दिवसापासून भुदरगड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून ओढे-नाले भरून वाहत आहेत,या पावसामुळे सखल भागात पाणीचपाणी झाले आहे. गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढलेने वेदगंगा नदीला पूर आला आहे, या नदीचे पाणी यंदा पावसाळ्यात पात्राबाहेर पडले आहे,
तालुक्यातील सर्व बंधारे पाण्याखाली
या मुसळधार पावसामुळे भुदरगड तालुक्यातील वेदगंगा नदीवर बांधण्यात आलेले ममदापुर, मडूर,शेणगाव,आकुर्डे, म्हसवे, निळपन, वाघापूर ही सर्व बंधारे पाण्याखाली गेली आहेत.ममदापुर बंधाऱ्यावर पाणी आलेने ममदापुर-वेंगरूळ मार्ग बंद आहे, शेणगाव बंधाऱ्यावर पाणी आलेने शेणगाव सोनारवाडी मार्ग बंद आहे,

गारगोटी-म्हसवे मार्ग दुसऱ्यांदा बंद

वेदगंगा नदीचे पाणी म्हसवे बंधाऱ्यावर दुसऱ्यांदा गारगोटीहुन म्हसवे मार्गे मिणचे खोऱ्यात होणारी सर्व वाहतूक बंद झाली आहे, ही वाहतूक आता गारगोटी – आकुर्डे,-महालवाडी मार्गे म्हसवे अशी सुरू आहे.

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
गेले दोन दिवस सतत पडत असलेल्या दमदार पावसाने नदी नाले ओसंडून वाहत आहेत. शालेय जीवन व नोकर व्यावसायिकांवर याचा परिणाम जाणवत आहे. असाच पाऊस आणखी दोन दिवस लागल्यास वेदगंगा नदी ला आणखीन मोठा महापूर येण्याची चिन्हे आहेत. नदिकाठावरील लोकांना सतर्क राहाण्याचा आदेश तहसिल भुदरगड कडून देण्यात आला आहे.दोन दिवसापुर्वीच नदीचे पात्र बाहेर पडले आहे.त्यामुळे नदिकाठची भात ऊस आदी पिकांची हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.असा पाऊस सतत चालू राहिल्यास या पिकांवर याचा विपरित परिणाम होणार असून शेतकरी आर्थीक आरिष्टात सापडणार आहे.भुदरगड तालुक्याच्या कडगांव पाटगांव या जास्त पावसाच्या भागात तर पावसाने थैमान घातले आहे.सरासरी इतका पाऊस सर्वत्र जाणवत आहे.अशातच पाटगांव प्रकल्पाचे गेट तिरके बसल्याने पाण्याचा विसर्ग वाढला आहे. काही गळती पण आहेत.याही प्रकल्पाचे गळती दुरूस्ती काम युध्दपातळीवर हाती घेणे गरजेचे आहे.अंन्यथा यावर्षी उंन्हाळ्यात शेतकरी राजाला फटका बसू शकतो. वाढत्या पावसामुळे शेतऱ्यांनी भाक ची कामे थांबवली आहेत मात्र रोप लावणीचे काम जोरात आहे. पावसाच्या वाढत्या प्रमाणामूळे या सह्याद्रीच्या पश्चीम घाटमाथ्यावरील सर्व धबधब्यांना मोठे पाणी असल्याने तरुणाई या धबधब्यांत चिंभ भिजताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here