पावसाचा जोर कायम , जिल्ह्यातील 60 बंधारे पाण्याखाली

0
240

कोल्हापूर – गेल्या 24 तासांहून अधिक वेळ कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील 60 बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर राधानगरी धरण 60 टक्के भरलं आहे. पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, चंदगड मध्ये अतिवृष्टी सुरू असून अनेक नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये जनजीवन ठप्प झाले आहे. गगनबावडा तालुक्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक 122 मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.आज दुपारी 12 पर्यंत पंचगंगा नदीची पाणीपातळी 35 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील सर्वच मंदिरे पाण्याखाली गेली आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here