लोकसंख्या दिना निमित्त प्रभात फेरीचे आयोजन

0
367

कोल्हापूर प्रतिनिधी : जिल्हा परिषदेमार्फत जागतिक लोकसंख्या दिना निमित्त जनजागृतीसाठी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत भालेराव, जिल्हा माता बाल संगोपन अधिकरी डॉ. फारुख देसाई, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने व आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, मेन राजाराम हायस्कुलचे विदयार्थी, शिक्षक तसेच सी.पी.आर. नर्सिंग कॉलेज मधील विद्यार्थीनी उपस्थित होत्या. यावेळी डॉ. योगेश साळे म्हणाले की, अर्माद लोकसंख्या वाढीमुळे बेरोजगारी, आपु-या आरोग्य सेवा, अन्न धान्य तुटवडा,महागाई, स्थलांतर, पर्यावरण समस्या निर्माण झाल्या आहेत. 11 जुलै ते 24 जुलै लोकसंख्या स्थिरता पंधरवडा साजरा करण्यात येणार असून यामध्ये तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन, कु.क. शस्त्रक्रिया शिबीर, तांबी बसविणे तसेच तात्पुरत्या व कायमच्या कु.क. नियोजनच्या पध्दती माहिती व जनजागृती या पंधवडयात करण्यात येणार आहेत. तसेच कुटुंब नियोजन करुन स्विकारा जबाबदारी, आई व बाळाच्या संपूर्ण आरोग्याची ही तयारी या घोष वाक्याची या वर्षी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही डॉ. साळे यांनी सांगितले. शेवटी डॉ. देसाई यांनी उपस्थिताचे आभार मानले व प्रभात फेरीची सांगता करण्यात आली. यावेळी आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र , शेंडा पार्क येथील प्रक्षिणार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here