गारगोटी शहरातील मुख्य रस्ता खड्डड्यात ; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

0
284

गारगोटी / प्रतिनिधी
गारगोटी पाटगाव राज्य मार्गावरील गारगोटी येथील जोतिबा चौक ,आझाद चौक परिसरातील रस्त्यावरून गाडी चालवायची तरी कशी असा प्रश्न वाहनधारकांना पडलेला आहे कारण या रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे .सार्वजनीक बांधकाम विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. अवजड व मोठ्या वाहनांनी या रस्त्यावर खड्डे निर्माण केले आहेत. याच रोडवरून मौनी विधापीठ मधील शाहू कुमार भवन ,जवाहर लाल बाल भवन ,कुमार विध्या मंदिर अशा विविध शाळा ना व कॉलेज ला विध्याथ्याना जावे लागते यावेळी रस्त्यावरून जाताना एखादी एसटी वा मोटर सायकल जवळून गेली की खड्ड्यातील चिखल वा पाणी त्यांच्या युनिफार्मवर उडले जाते त्यांच्या युनिफार्मवर खराब होतो अशा घटना अनेक वेळा घडल्या आहेत .तर कोणता खड्डा चुकवावा हे वाहनधारकांना समजेनासे झाले आहे यामुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच रस्त्यावरून निसर्गरम्य पाटगाव परिसर ,दोनवडे धबधबा ,फये लघु प्रकल्य याकडे निसर्ग प्रेमी ना जावे लागत असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे .
सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची डागडुजी तात्काळ करावी अशी मागणी निसर्गप्रेमी व गारगोटी शहरातील नागरिकांतून पुढे येत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here