कोल्हापूर शहरातील प्रत्येकाने सुका, ओला व प्लॅस्टिक कचरा वेगळा करा. आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी

0
108

कोल्हापूर :
स्वच्छ व सुंदर कोल्हापूर या संकल्पनेची अंमलबजावणी कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत करणेत येत आहे. या अनुषंगाने सातत्याने स्वच्छता मोहिम लोकसहभागातून कोल्हापूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राबविणेत येत आहे.
याअंतर्गत कोल्हापूर शहरातील 16 शाळांतील स्वच्छता दूत शिक्षक यांची कार्यशाळा प्रतिभानगर येथील महापालिकेच्या वि.स.खांडेकर विद्यामंदिर येथे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सागरमित्रचे सहसंचालक विनोद बोधनकर यांनी या कार्यशाळेस उपस्थित स्वच्छता दूत शिक्षकांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत विनोद बोधनकर यांनी चित्रफितीमधून विविध देशामध्ये प्लॅस्टिक वापरामूळे भुतलावरील समुद्र, नद्यामधील जलचर प्राण्यांवर झालेल्या दुष्यपरिणामाची माहिती देवून पुणे शहर येथील माध्यमिक विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून प्लास्टिक मुक्तीवर यशस्वी व व्यापक केलेबद्दल मार्गदर्शन केले. सागरमित्र अभियानात माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्लास्टिक प्रदुषणामूळे होणाऱ्या मुक्या प्राण्याच्या जिवीतहानी बद्दल सांगितले जाते. यामूळे प्रभावित होवून ते विद्यार्थी पक्षी, मासे, यांना वाचविण्यासाठी घरातच कागदाची रद्दी ज्या प्रमाणे जमा करण्याची पध्दत आहे त्याच प्रमाणे टाकाऊ प्लॉस्टिकची रद्दी जमा करतात घरातले महिन्याभराचे जमा केलेले टाकाऊ कोरडे प्लास्टिक महिन्यातून एकदा शाळेत आणून देतात. हे प्लास्टिक रिसायकलींगला पाठविले जाते आणि त्यामूळे पक्षी, मासे वाचतात. अशा प्रकारे असंहितेचे काम पुण्यातील 153 शाळांतील 1,37,000 विद्यार्थी करीत आहेत. त्यामूळे 200 टन स्वच्छ, कोरडे, रिकामे प्लास्टिक रिसायकल झालेने मुलांवर जलसंस्कार सुरु झाले असलेचे मत व्यक्त केले.सदर कार्यशाळेस शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, उषा सरदेसाई, क्रीडा निरिक्षक सचिन पांडव हे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here