महाडिक यांच्या गाडीचे दरवाजे उघडणाऱ्यानी आरोप बंद करावेत : धैर्यशील देसाई

0
2441

कोल्हापूर प्रतिनिधी:
एकेकाळी माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्या गाडीचे दरवाजे उघडणाऱ्यानी त्यांचावर राजकीय स्वार्थापोटी बिनबुडाचे आरोप बंद करावे.असे आवाहन गोकुळ संचालक धैर्यशील देसाई यांनी पत्रकाद्वारे केले आहे. त्यांचा या आरोपामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.गोकुळ हे शेतकर्याची अस्मिता आहे. त्याच्यामुळे जिल्हात आर्थिक सुभगता आली आहे. काल आमचे नेते आम.महादेवराव महाडिक यांच्यावर टीका केली आहे. ही टीका राजकीय दोषापोटी केली आहे. ही टीका गोकुळ मल्टीस्टेट बाबत कोणतीही माहिती न घेता लोकांची दिशाभूल सुरू केली आहे. पण आरोप करणारी व्यक्ती एकेकाळी आम. महाडिक यांच्या गाडीचा दरवाजा उघडत होते. त्याच्या आशिर्वादामुळे राजकारणात आले आहेत. त्यांनी राजकीय हव्यासापोटी गोकुळ बदनाम करण्याचा घाट घातला आहे.लोकांनी त्याच्या नादी लागू नये असे आवाहन पत्रकात केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here