कर्नाटकात राजकीय पेच, सरकार वाचविण्यासाठी कुमारस्वामींची अस्तित्व पणाला

0
94

बेळगाव:
काँग्रेस आणि जेडीएसच्या 13 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे कर्नाटकच्या राजकारणात निर्माण झालेला पेच रोज वाढतच आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची सरकार वाचविण्यासाठी शेवटची धडपड सुरू असतानाच आज काँग्रेसचे निलंबित आमदार रोशन बेग यांनी राजीनामा दिला आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांनी नवा ‘डाव’ खेळला असून, राजीनामा दिलेल्या 14 पैकी नऊ आमदारांचे राजीनामे नियमांच्या चौकटीत नाहीत असे म्हटले आहे. दरम्यान, कन्नडानडीचे पडसाद राजधानी दिल्लीत उमटले. काँग्रेससह विरोधी पक्षांनी लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ घातला. त्यामुळे संसदेचे कामकाज तहकूब करावे लागले.काँग्रेसचे 10 आणि जेडीएसच्या 3 आमदारांनी गेल्या आठवडय़ात राजीनामे दिले. दोन दिवस मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये पाहुणचार घेऊन हे आमदार पुणे मार्गे गोव्याला जाण्यासाठी निघाले होते; पण ते परत फिरले. आज आमदार आर. रोशन बेग यांनी राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला. बेग यांना यापूर्वीच पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे काँग्रेस पक्षाने निलंबित केले होते. मात्र, बेग यांचा पाठिंबा कुमारस्वामी सरकारला कायम होता. ते कर्नाटक हज समितीचे अध्यक्षही आहेत. बेग यांच्या राजीनाम्यामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारला झटका बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here