पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांना रशियाने पाठवले नाही आमंत्रण

0
106

कराची :
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना पुन्हा एकदा नाराजी स्विकारावी लागली आहे. पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडले आहे. रशियाने स्पष्ट केले की पाकिस्तानच्या पंतप्रधानांना ईस्टर्न इकोनॉमिक फोरमसाठी आमंत्रित करण्यात येणार नाही. ही बैठक रशियात पोर्ट सिटी व्लादिवोस्टोकमध्ये होणार आहे.
पाकिस्तानी मिडियाने मागील आठवड्यात बातमी दिली होती की, इमरान खान यांना रशियांचे राष्ट्रपती पुतिन यांच्याकडून निमंत्रण मिळाले आहे. या वृत्तत सांगण्यात आले होते की, बिश्केक या बैठकीत पुतीन यांना पाकचे पंतप्रधान इमरान खान यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
रशियाच्या परराष्ट्रीय मंत्रालयाने सोमवारी यावर माहिती देत सांगितले आहे की, दक्षिण आशियांच्या मिडियामधून काही वृत्त येत आहेत, ज्यात सांगण्यात आले आहे की पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना व्लादिवोस्टोकमध्ये ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या ईस्टर्न इकोनॉमिक फोरमच्या बैठकीत गेस्ट ऑफ ऑनर म्हणून बोलावण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here