दयानंद भोईटे यांची राजे प्रतिष्ठान जिल्हाध्यक्षपदी निवड

0
193

गारगोटी प्रतिनिधी:
दिंडेवाडी गावचे सुपूत्र व भुदरगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष दयानंद भोईटे यांची छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापित राजे प्रतिष्ठान या महाराष्ट्रभर पसरलेल्या संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाली. दयानंद भोईटे हे गेली तीन वर्ष सातत्याने भुदरगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून भुदरगड तालुक्यात काम करत आहेत. सामाजिक-सांस्कृतिक-कला व क्रिडा क्षेत्रात भुदरगड प्रतिष्ठानने अल्पावधीतच आपला झेंडा रोवला आहे. त्यांच्या भुदरगड प्रतिष्ठान या संघटनेचे कार्य बघून दयानंद भोईटे यांना हि नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.
राजे प्रतिष्ठानचे संस्थापक छ. खासदार उदयनराजे हे दयानंद भोईटे यांचे आजपर्यंतचे काम पाहून खुष झाले. व त्यांनी राजे प्रतिष्ठान कोल्हापूर जिल्हाभर पसरवा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास दिला. यावेळी भुदरगड प्रतिष्ठानकडून खा. उदयनराजेंना त्यांचीच प्रतिमा भेट म्हणून दिली. राजे प्रतिष्ठानचे महाराष्ट्र अध्यक्ष मा. नितीनदादा शिंदे हे दयानंद भोईटे यांचे कार्य पाहून खुश झाले. ते म्हणाले की,” राजे प्रतिष्ठानची कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी आम्ही दयानंद भोईटे यांच्या खांद्यावर देत आहोत. हि जबाबदारी ते यशस्वीपणे निभावतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. तसेच इथून पुढे आम्ही सर्वच क्षेत्रात दयानंद भोईटे यांच्या पाठिशी उभे राहू असे मत व्यक्त केले.
नियुक्तीचे पत्र छ. उदयनराजेंच्या जलमंदिर या राजवाड्यावर देण्यात आले. यावेळी कपिल गुरव, मोहन भोईटे, सुनील भोईटे, प्रणित देसाई, रोशन भोसले व कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here