दिल्लीत राज ठाकरे यांची काँग्रेस वारी ; सोनिया गांधी यांची निवासस्थानी भेट

0
150

नवी दिल्ली:
दिल्ली दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. महाराष्ट्रात पुढच्या तीन महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोनिया गांधींची घेतलेली भेट खूप महत्वपूर्ण आहे. दोन्ही नेत्यांमध्ये कार्य चर्चा झाली ते समजू शकलेले नाही. लोकसभा निवडणुकीच्यावेळीही राज ठाकरेंनी मोदी-शाहंविरोधात जोरदार प्रचार करत अप्रत्यक्षपणे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला साथ दिली होती. त्यावेळी मनसेने लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here