ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ताकद वाढली; 500 किमी अंतरावरील शत्रुचा घेणार अचूक वेध

0
126

नवी दिल्ली:
पाकिस्तानातील बालाकोट येथे Air Strike केल्यानंतर भारतानं आता क्षेपणास्त्रांच्या आधुनिकीकरणावर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. 290 किलो मीटर मारक क्षमता असलेलं ब्रह्मोस आता 500 किलो मीटरपर्यंत शत्रुचे ठाणे उद्धवस्त करू शकणार आहे. यापूर्वी भारतानं 40 सुखोई विमानं ब्रह्मोस क्षेपणास्त्रानं सज्ज करण्याची प्रक्रिया वेगानं सुरू केली आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे सीईओ सुधीर कुमार मिश्र यांनी याबाबतची माहिती दिली. ब्रह्मोसची मारक क्षमता वाढवल्यानं आता भारताच्या संरक्षण ताकदीमध्ये वाढ झाली आहे. सुखोई – 30 या विमानांवरून ब्रह्मोस आता लक्ष्यभेद करू शकणार आहे, अशी कामगिरी करणारा भारत देशातील पहिलाच देश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here