६४ गावांना जिहेकठापूर, टेंभूचे पाणी

0
66

सातारा:
माण-खटाव तालुक्यातील 64 वंचित गावांना जिहे कठापूर उपसा सिंचन आणि टेंभू योजनेचे पाणी देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. आ. जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे शुक्रवारी मुंबई येथे प्रधान सचिव आणि उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबत विविध आदेश दिल्याने माण-खटाव तालुक्यातील 64 गावे ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मुंबई येथील वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीला खा. रणजितसिंह ना. निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, प्रधान सचिव चहल, भाजपा नेते महेश शिंदे, प्रकल्प सचिव घाणेकर, अधीक्षक अभियंता विजय घोगरे, मंत्रालयाचे उपसचिव आणि दोन्ही पाणीयोजनांचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here