देशाला पॉवरहाऊस बनवणारा अर्थसंकल्प’: पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
175

दिल्ली:
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा देशाला नैराश्यातून बाहेर काढून खर्‍या अर्थाने ‘पॉवरहाऊस’ बनवणारा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या अर्थसंकल्पामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असा विश्‍वासही त्यांनी दूरचित्रवाणीवरील भाषणात व्यक्‍त केला आहे.
ते म्हणाले, नवभारताच्या निर्मितीच्या पथावर जाणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यामध्ये देशातील गरीब जनतेचा, प्रत्येक घटकाचा विचार केला आहे. या बजेटमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. 21 व्या शतकातील आशा-आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here