कोळसा वाहून नेणारे बार्ज रेवस समुद्रात बुडाले

0
122

मुंबई:
रेवस नजीक समुद्रातून कोळसा वाहून नेणारे मालवाहू बार्ज बुडाल्याची घटना सकाळी नऊ वाजता घडली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बार्जमधील नऊ जणांना दुसऱ्या बोटीतून सुखरूप धरमतर पोर्टवर आणले आहे.
मुंबईहून कोळसा नेण्यासाठी धरमतर पोर्टवर मालवाहू बार्ज येत होते. त्यावेळी तीन नंबर बोया जवळ बार्ज आल्यानंतर इंजिनमध्ये पाणी गेल्याने ते बुडू लागले. अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. बार्जवर कर्मचारी होते त्यांना दुसऱ्या बोटीने सुखरूप बाहेर काढले असून धरमतर पोर्टवर आणले आहे.
या बार्जवर एकूण किती कर्मचारी होते याची पूर्ण माहिती मिळालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here