इराण आगीशी खेळत आहे – ट्रम्प

0
200

पीटीआय:
युरेनियम समृद्धीचे प्रमाण आम्ही 2015 च्या अणु कराराच्या मर्यादेपेक्षा ओलांडले आहे अशी घोषणा इराणने केल्यानंतर अमेरिकेने त्यावर तीव्र संताप व्यक्‍त केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी या संबंधात इराणला इशारा देताना म्हटले आहे की तुम्ही आगीशी खेळत आहात. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय समुदायानेही इराणवर जोरदार आगपाखड केली आहे. इराणवर बहिष्कार घाला आणि त्यांच्यावर कडक निर्बंध लागू करा अशी सुचना इस्त्रायलने युरोपियन समुदायाला केली आहे. इराणने अणु कराराच्या मर्यादा ओलांडू नयेत अशी सुचना संयुक्तराष्ट्रांनीही त्यांना केली आहे.
इराणवर समृद्ध युरोनियमची तीनशे किलोंची मर्यादा घालण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here