मुंबई, नाशिक आणि पुणे शहरांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

0
86

मुंबई:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत अनेक मोठ्या घोषणा केल्या. मुंबई, नाशिक आणि पुणे या शहरांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या घोषणा केल्या. याचबरोबर मोठ्या शहरांमध्ये सुरु असलेले मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी विधानसभेत केली. त्याचबरोबर मुंबईच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद देखील केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर मुंबई आणि पुण्यातील अंतर अर्ध्या तासावर आणण्यासाठी हायपरलूप प्रकल्प देखील लवकरच सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच विरार आणि अलिबाग या १२३ किलोमीटरच्या कॅरिडॉरमुळे मुंबईच्या आसपासच्या शहरांचा चेहरा बदलणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here